संस्थेची माहिती

कृषी उत्पन्न बाजार समिती, कळवण

अ.क्र. मूलभूत माहिती तपशील
1 स्थापना 1/4/1973
2 इ-मेल am_kalvan@msamb.com
3 फोन क्रमांक 02592- 221058
4 चेअरमन नांव श्री. धनंजय (आण्णा) मोतीराम पवार
5 उद्धेश शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालची योग्य्‍ भावात विक्री होऊन शेतकरी बांधवांना रोख पैसे मिळावे तसेच व्यापा-यांना एकाच ठिकाणी उच्च्‍ प्रतिचा शेतमाल मिळावा. कळवण तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांना आपला शेतमाल विक्री करण्यासाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून त्यांनी घामाने पिकविलेला शेतमाल योग्य बाजारभाव अचूक वजन माप आणि वेळेवर पैसे या त्रिसूत्रीत काम करून शेतकरी व्यापारी आणि इतर घटकांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीचा उद्देश बाजार समितीचा आहे. बाजार समिती शेतकरी वर्गाची आर्थिक फसवणूक किंवा पिळवणूक न होता त्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला 24 तासाच्या आत मिळावा व अनधिकृतरित्या होणारी कट्ती बंद व्हावी. बाजार समितीशी संबंधित घटकांच्या हिताची जपून व्हावी यासाठी बाजार समिती स्थापना करण्यात आली.
6 बाजारक्षेत्र बाजार समितीचे एकूण क्षेत्र- 7.20 हे. (19.50 एकर)

  • 1. मुख्य्‍ बाजार आवार कळवण- एकूण क्षेत्र- 2.5 हे. (7 एकर)
  • 2. नाकोडा उपबाजार आवार- एकूण क्षेत्र- 2.5 हे. (7 एकर)
  • 3. अभोणा उपबाजार आवार- एकूण क्षेत्र- 1.20 हे. (3 एकर)
  • 4. कनाशी उपबाजार आवार – एकूण क्षेत्र- 1 हे. 2.5 (एकर)

बाजार आवार -

1. मुख्य बाजार आवार कळवण

कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवार कळवण येथे असून स्वमालकीची सात एकर जमीन असून कळवणच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. बँक, दुकाने व शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूचे दुकाने आवाराच्या जवळचं आहेत. बाजारावर मुख्य कार्यालयासह शेतकरी निवास व किरकोळ व व्यवसायिकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कांदा व भुसार लिलावासाठीचे व्यापाऱ्यांचे शेड असून संपूर्ण यार्डाचे काँक्रिटीकरण झालेले असून सांडपाण्याची व्यवस्था केलेली आहे. मुख्य बाजार आवारात भुसार शेतमालाचे दैनंदिन लिलाव होतात. तसेच दर बुधवारी शेळ्यांचा बाजार होत असतो. मुख्य बाजार आवारात शेतकऱ्यांना व बाजार घटकातील लोकांना पिण्यासाठी RO पाण्याची सुविधा उपलब्ध केलेली असून स्वच्छतागृहही उपलब्ध आहेत. यार्डात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत. संपूर्ण यार्ड काँक्रिटीकरण असल्याने पावसाळ्यातील व्यवस्थितपणे शेतमाल विक्रीचे व्यवहार होत असतात. तसेच बाजार समितीचे उपबाजार नाकोडा, आभोणा आणि कनाशी या तीन ठिकाणी कांद्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात.


2. उपबाजार आवार नाकोडा

उपबाजार नाकोडा येथे बाजार समितीची स्वमालकीची 07 एकर असून संपूर्ण यार्ड काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण केलेले आहे. यार्डच्या सभोवताली पक्के वॉल कंपाउंड असून दोन इंट्री गेट्स आहेत. यार्डात शेतकरी आणि व्यापारी बांधवांसाठी RO पिण्याच्या पाण्याची सुविधा असून पावसाळ्यात व उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून लिलावासाठी शेड उपलब्ध आहेत. यार्डातच वजनकाटा असून विक्री झालेल्या शेतमालाच्या मापासाठी बाजार समितीचा वजनकाटा उपलब्ध असून चोख वजनमाप केले जाते. शेतकरी बांधवांना चहा नाश्ता पाणी आणि जेवणासाठीची सुविधा यार्डातच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यार्डातील शेतकऱ्यांच्या वाहनांची व्यवस्था देखभाल व संरक्षणाची जबाबदारी बाजार समितीचे असल्याने 24 तास वॉचमन उपस्थित असतात. यार्डाला पूर्ण कडेकोट बंदोबस्त असून दोन गेट उपलब्ध आहेत. यार्डात दररोज 1000 ते 1500 वाहनांचा लिलाव होत असतो.


3. आभोणा उपबाजार आवार

अभोणा उपबाजार आवर कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे दुसरे उपबाजार असून बाजार समितीची स्वमालकीची 7 एकर जागा आहे. अभोणा बाजारावर लिलावसाठी शेड, कार्यालय , कॅन्टीन, वजन काटा या सगळ्या सुविधा उपलब्ध असून कांदा व भाजीपाल्याचा खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. आदिवासी पट्ट्यातील असलेल्या या उपबाजार अभोणा आवारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असून स्वच्छतागृही उपलब्ध आहेत. संपूर्ण यार्ड डांबरीकरण व कॉक्रीटीकरण असून लिलावासाठी शेड ही उपलब्ध आहेत. 500 ते 2000 ट्रॅक्टरचा कांद्यांचा लिलाव दररोज होत असतो. इतर राज्यातून अभोणा उपबाजार आवारातील कांदा या शेतमाला खूप मोठी मागणी असल्याने व्यापारी संख्या भरपूर आहेत. योग्य बाजारभाव, चोख वजन माप आणि रोख पेमेंट या त्रिसूत्रीवर अभोणा उपबाजार आवार नावरुपास आले.


4. कनाशी उपबाजार आवार

कनाशी उपबाजार आवारावर कांदा या शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. बाजार समितीची स्वमालकीची 2.5 एकर जमीन असून सगळे लिलाव कनाशी उपबाजार आवारावर होत असतात. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, वजनमाप इत्यादी सुविधा यार्डात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

शेतमाल विक्री पध्दत -

कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे विश्वास पात्र बाजारपेठ असून मुख्य बाजारावर उपबाजार आवर विक्री होणारा शेतमाल उघड बोली पद्धतीने लिलाव केला जातो. लिलावाचे ठिकाणी यार्डांमध्ये लिलावासाठी शेड उपलब्ध्‍ असून पावसापासून त्याचे संरक्षण होते. लिलाव झाल्यानंतर खाली पडणारा जो शेतमाला असतो तो ट्रॉलीमध्ये परत टाकण्यासाठी ची सेवा बाजार समिती मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बाजार समितीचे सेवक लिलावाचे ठिकाणी उपस्थित असतात त्यांचे मार्फत विक्री झालेल्या मालाची नोंद ठेवून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करून शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या शेड बद्दल माहिती दिली जाते. मुख्यत्वाने कांदा व भुसार शेतमालाची मोठया विक्री होत असल्याने मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात. विक्री झालेल्या शेतमालाचे चोख वजन माफ करून रोख स्वरूपात पेमेंट अदर केले जाते. तसेच बाजाराबारात सर्व शेतकरी बांधवांना अवगत केले जाते की 24 तासाच्या आत व्यापा-यांकडून विक्री केलेल्या शेतमालाचे पेमेंट घेतले गेले पाहिजे कुठल्याही अडीअडचणी असतील बाजार समितीचे संपर्क करा अशा पद्धतीने यार्डांमध्ये स्पिकरकवर अनाउन्सिंग केले जाते. संपूर्ण तालुका व परिसरातील येणाऱ्या शेतकऱ्यांना लवकर घरी जाता यावे यासाठी वजन मापाची सोय प्रत्येक यार्डात केलेली असून अचूक वजन बाजार समितीच्या वजनकाटयांमार्फत मोजले जाते.

वैशिष्ठे -

बाजार समितीच्या सगळ्याच आभारांमध्ये प्रवेशव्दार, संरक्षक भिंत, कार्यालय, भुईकाटा, लिलाव शेड, व्यापारी शेड, लिलावासाठी जागा, कॅन्टीन, पिण्याचे पाणी RO ]स्वच्छतागृह, इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. कांदा, मका, गहू, बाजरी, सोयाबीन, तूर, उडीद, मुग, भुईमुग शेंगा, तांदुळ इत्यादी कडधान्याचे खरेदी-विक्रीचे व्य्‍वहार बाजार आवारात होत असतात.

सामाजिक उपक्रमात शेतकरी प्रशिक्षण, स्वच्छता अभियान, तज्ञांचे मार्गदर्शन शिबिरे, कृषी विभागाकडून शेतकरी संवाद, शेतकरी बांधवांना बाजार भाव आवक व दररोजची माहिती पुरविली जाते. गुरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हाळ तयार केलेले असून गुरांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नविन करावयाची कामे -

संरक्षक भिंत, रंगकाम किरकोळ, हाय मास्ट, लिलाव शेड, कार्यालय इमारत, वे ब्रीज, इलेक्टीफिकेशन त्यादी रिपेअरींग कनाशी यार्ड ला ऑफीस, भुईकाटा, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, डांबरीकरण इत्यादी

Top